सावंतवाडी प्रतिनिधी
वीज ग्राहक संरक्षण समिती तालुकास्तरीय गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संजय लाड सचिव पदी संजय नाईक तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक आनंद नेवगी सहसचिव दीपक पटेकर आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या तालुकास्तरीय कमिटीमध्ये शहर व ग्रामीण भागातील सदस्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे . गणेश चतुर्थी कालावधीत वीज पुरवठा कोठेही खंडित होऊ नये म्हणून येत्या सोमवारी 28 ऑगस्ट रोजी वीज अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले. आज सावंतवाडी येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुल पत्रकार कक्षात वीज ग्राहक संरक्षण समितीची बैठक झाली . या बैठकीत जिल्हा सचिव निखिल नाईक., तालुका अध्यक्ष संजय लाड, बाळासाहेब बोर्डेकर ,जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी, उमाकांत वारंग, नकुल पार्सेकर उल्हास सावंत ,सुनील सावंत, रामचंद्र राऊळ, संजय कानसे, मोतीराम कामत ,असलम खलिफ, माधुरी वालावलकर, सुभाष सावंत, कृष्णा गवस ,शैलेश कुडतरकर ,समीर शिंदे, अनिकेत म्हाडगूत, संतोष तावडे आदी उपस्थित होते.