आ. वैभव नाईक यांच्या हस्ते प्रदान
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार सावंतवाडी येथील श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबुराव चव्हाण यांना संत रविदास समाज भूषण पुरस्कार कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चर्मकार समाजाच्या प्रती केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने झालेल्या सिंधुदुर्गनगरी येथील सोहळ्यात त्यांनी समाजाप्रती केलेल्या कामाबरोबर सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे. राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्तीनंतर त्यांनी आपल्याला समाजसेवेमध्ये झोकून घेतले. उल्लेखनीय कामगिरी म्हणजे कोलगाव पांडव नगरी येथील चर्मकार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. गेली अनेक वर्षे या वस्तीकडे जाणारा रस्ता नव्हता याबद्दल आमदार नाईक यांनी त्यांचे कौतुक केले. चर्मकार समाज उन्नती मंडळाचे ते सावंतवाडी तालुका समिती व जिल्हा कार्यकारीणीचे ते फाउंडर मेंबर आहेत. सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव या गावचे ते सुपुत्र असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी बबीता चव्हाण, गटविकास अधिकारी विजय चव्हाण सावंतवाडी उन्नती मंडळाचे सचिव गुंडू चव्हाण,सावंतवाडी तालुका माजी अध्यक्ष विजय चव्हाण, श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सदानंद चव्हाण ,विनायक चव्हाण तसेच चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव तसेच वंश चव्हाण, भावेंद्र चव्हाण ,राजकुमार चव्हाण, गार्गी चव्हाण प्राजक्ता चव्हाण ,रेषा चव्हाण, रसिका चव्हाण व सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.