सातारा प्रतिनिधी
ऊस तोडीसाठी कामगार देतो असे सांगून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची 20 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुकादमास कोरेगाव पोलिसांनी जीवाची बाजी लावून अटक केली आहे. परभणी जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील ठिकाणी जाऊन खवणे पिंपरी या त्याच्या गावातून मुकादमास अटक केली.या मोहिमेबद्दल आरोपीस पकडून आणण्याचे धाडस करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत यांच्यासह त्यांच्या पथकाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.