सातारा प्रतिनिधी
हायब्रीड ॲन्युटी मॉडेल या योजनेअंतर्गत डाळज- कळस-नातेपुते-शिंगणापुर- दहिवडी-पुसेसावळी ते कराड रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये शिंगणापुर घाटातील 500 मी लांबीचा रस्ता सुधारण्याचे काम पूर्ण करण्यासाठी दिनांक 24 जुलै ते 07 ऑगस्ट 2023 या कालावधीत शिंगणापुर घाटातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला होता.
या कालावधीत घाट रुंदीकरणाचे कामास आलेल्या नैसर्गिंक अडचणी, पावसाची संततधार कड्याच्या उंचीवर काम करणाऱ्या यंत्रणेवर प्रभावी ठरत असल्याने तसेच या कामामुळे कोसळलेल्या संरक्षक भिंत व कठडे यांचे दुरुस्ती आणखी कालावधी लागणार असल्याने दि.22 ऑगस्ट 2023 पर्यंत शिंगणापुर घाटातील वाहतुक मार्गात बदल राहणार असून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत.
पर्यायी मार्ग- नातेपुतेकडून शिंगणापुरकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी नातेपुते- पिंपरी- कोथाळे – शिंगणापुर या पर्यायी मार्गाने वाहतुक करावी. तसेच शिंगणापुरकडून – नातेपुतेकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी शिंगणापुर- कोथाळे- पिंपरी- नातेपुते या पर्यायी मार्गाने वाहतुक करावी