ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लडाखमध्ये लष्कराचं वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळलं. या दुर्घटनेत 9 जवानांना वीरमरण आलं. तर 1 जवान गंभीररित्या जखमी आहे. या अपघातात साताऱ्यातील जवान वैभव संपत भोईटे (मूळ रा. राजाळे ता. फलटण) यांचाही मृत्यू झाला.
वैभव भोईटे हे 2018 मध्ये आर्मीमध्ये भरती झाले होते. 311 आर्टिलरी रिजिमेंटमध्ये ते होते. त्यांच्या युनिटची पोस्टिंग लडाखमध्ये आहे. ते विवाहित असून त्यांची पत्नी सातारा पोलीस सेवेत कार्यरत आहे. त्यांना एक लहान मुलगी आहे. आई, वडील, लहान भाऊ दोन विवाहित बहीण असा परिवार आहे.