प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांची कन्या अनुष्का विश्वजित घोडके हिने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे. अनुष्काने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी विशेष कौतुक केले. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवणे ही अंत्यत कठीण बाब असून त्यामध्ये राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान साताऱयाची अनुष्का घोडके हिने पटकावला आहे.
साताऱयात देशातले पहिले सैनिक स्कूल आहे. त्याचबरोबर सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश देण्याची प्रक्रिया ही साताऱयाच्या सैनिक स्कूलमध्ये सर्वात प्रथम झाली. त्याच सैनिक स्कूलमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेली परीक्षा ही अंत्यत अवघड समजली जाते. देशभरातील विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला बसलेले असतात. वेगवेगळे क्लासेस विद्यार्थी करत असतात. याच प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यामध्ये राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान हा सातारा पोलीस दलातील सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांची कन्या अनुष्का हिने पटकवला आहे. तिने 300 पैकी 262 गुण मिळवले आहेत.
अनुष्का घोडके हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे विशेष कौतुक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलेले आहे. त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटची विद्यार्थिनी असून मुलींसाठी वेगवेगळ्या 5 कॅटेगरीमधून राज्यात पहिले आले तर प्रवेश असतो, त्यात 1 कॅटेगरीमधून पहिली अनुष्का आलेली आहे.