कंपाला
युगांडाची राजधानी कंपाला शहराच्या बाहेरील भागात एका शाळेत आग लागल्याने मुलामुलींसमवेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱयाने मंगळवारी दिली आहे. मुकोनो येथील दृष्टीहीन मुलांच्या शाळेत रात्री आग लागली होती असे पोलीस प्रवक्ते ल्यूक ओवोयेसिगिरे यांनी सांगितले आहे. या पूर्व आफ्रिकन देशातील शाळांमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्याने अधिकाऱयांसमोर चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.