चिन, पाकिस्तान, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा सहभाग : जी 20 परिषदेंतर्गत आयोजन, सर्वत्र कडक बंदोबस्त
पणजी : शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांची परिषद गोव्यात आज गुऊवार दि.4 व उद्या शुक्रवार दि. 5 मे अशी दोन दिवस कोलवा (दक्षिण गोवा) येथील पंचतारांकीत हॉटेलात होणार असून तिची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भारतातर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली असून त्यासाठी चिनचे परराष्ट्रमंत्री किंन गंज, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेय लावरोव, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी हे उपस्थित रहाणार आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे या परिषदेचे अध्यक्षस्थान भुषवणार आहेत.
आज सकाळी सर्वांचे आगमन
भुत्तो हे गुऊवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत गोव्यात पोहोचणार आहेत तर रशिया तसेच चिनचे परराष्ट्रमंत्री देखील गुऊवारीच गोव्यात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्र्यासमवेत त्यांचे शिष्टमंडळ येणार असून विविध विषयांवर त्यांची एकमेकांशी चर्चा आखण्यात आली आहे. आज गुऊवारी सकाळी 10 वाजल्यापासून ही परिषद सुऊ होणार असून ती शुक्रवारपर्यंत चालणार आहे. परराष्ट्रमंत्री व शिष्टमंडळासाठी समुद्रकिनारी खास मेजवानी तसेच फेरफटका मारण्याची सुविधा करण्यात आला आहे.
सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त
परिषदेसाठी पोलिसांची मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मंत्री व त्यांच्या शिष्टमंडळाच्या वाहन ताफ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. दाबोळी व मोपा या दोन्ही विमानतळावऊन सदर पाहुणे मंडळी येणार असून त्यांच्या दिमतीसाठी पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे.
अफगाणिस्थानमधील कारवायांवर होणार चर्चा
अफगाणिस्थान देशातील स्थिती चिंताजनक असून तेथील तालिबान राजवटीत अतिरेकी दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्याचा फटका इतर देशांनाही बसतो. त्यामुळे गोव्यातील या परिषदेत परराष्ट्रमंत्र्यांमध्ये विशेष संवाद होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर विचारविनिमय करुन काही पावले उचलता येतील काय, याची शक्याशक्यता पडताळून पाहण्यात येईल. जी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अंतर्गत ही परिषद होत असून त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न चर्चेला जाणार आहे.