मुंबई:
झी एंटरटेनमेंटचा समभाग मंगळवारी 6 टक्के इतका बीएसईवर इंट्रा डे दरम्यान घसरणीसह 182 रुपयांवर व्यवहार करत होता. बाजारातील नियामक सेबी (सेक्युटिरीटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) यांनी कंपनीचे प्रवर्तक व एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा व व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पुनीत गोयंका यांच्यावर कोणत्याही सूचीबद्ध कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर राहण्याबाबत प्रतिबंध लावला आहे. याचा नकारात्मक परिणाम समभागावर मंगळवारी दिसून आला.