मंदिरे, सांस्कृतिक वारशांचा जीर्णोद्धार
वृत्तसंस्था /उज्जैन
उज्जैनमध्ये ‘महाकाल लोक’ प्रकलपाच्या दुसऱया टप्प्याचे काम सुरू झाले असून यात प्राचीन मंदिरे आणि वास्तूंचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. दुसऱया टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर याला श्री महाकाल महालोक’मध्ये रुपांतरित केले जाणार असल्याचे उद्गार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील आठवडय़ात 351 कोटी रुपयांच्या अनुमानित खर्चातून निर्मित श्री महाकाल लोक मार्गिकेचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित केला होता.
श्री महाकाल लोकच्या दुसऱया टप्प्याचे काम सुरू झाले असून यात शिखर दर्शनाचा विकास, ध्यान कक्ष, छोटा रुद्र सागराचा जीर्णोद्धार, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच धरोहर धर्मशाळा सामील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. एका पत्रासह महाकाल मंदिराचा प्रसाद सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच पींय मंत्र्यांसह देशातील महनीय व्यक्तींना पाठवून त्यांना महाकाल लोकच्या दर्शनासाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.