प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-सिकंदराबाद एक्स्प्रेसला नैर्त्रुत्य रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. आता दि. 30 जूनपर्यंत सिकंदराबाद एक्स्प्रेस धावणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. या एक्स्प्रेसमुळे बेळगाव-हैदराबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होत असल्याने रेल्वेला मागणी अधिक आहे. यामुळे आगाऊ आरक्षण एक्स्प्रेसला उत्तमप्रकारे होत आहे.
कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस कोरोनापासून बंद होती. यामुळे हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांना एकतर बसने अथवा हुबळीला पोहोचून तेथून रेल्वेने प्रवास करावा लागत होता. यामुळे बेळगाव-हैदराबाद मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी होत होती. नैर्त्रुत्य रेल्वेने याची दखल घेत बेळगाव-सिकंदराबाद एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. परंतु ही एक्स्प्रेस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्याने 30 मार्चपर्यंत धावणार होती. यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार आता ही एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार आहे.