गोमेकॉत एक विभाग आरक्षित, नव्याने 22 जणांना संसर्ग
प्रतिनिधी/ पणजी
कोविड संकटाने पुन्हा डोके वर काढले असून, दिवसेंदिवस कोविडबाधित ऊग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यासमोर पुन्हा कोविडचे संकट डोकावत असून, चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या चोवीस तासात 34 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली असून, त्यामध्ये एकूण 22 जणांना कोविडची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या कोविडबाधितांचा आकडा दोनशेच्या उंबरठ्यावर पोहचला असून, 190 सक्रिय कोविड ऊग्णांची संख्या झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 621 जणांचे नमुने तपासण्यात आले असून, त्यामध्ये 34 जणांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिनाभरात कोविडचे ऊग्ण झपाट्याने वाढत असून, आठ दिवसांच्या आत शंभरहून अधिक ऊग्णांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील विविध इस्पितळांत कोरोना चाचणीसाठी नागरिक गर्दी करीत असून, आता इस्पितळांवर कोविड तपासणी करून घेण्यासाठी लोकांची धांदल सुरू आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या ऊग्णांवर कोविडची धास्ती पुन्हा एकदा वाढली आहे. आरोग्य प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अजूनही लोक गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरत नसल्याने कोविडचे ऊग्ण सापडत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी, कार्यक्रमस्थळी तसेच लग्न व वाढदिवस समारंभाला जाताना कोविड प्रतिबंधक उपाययोजनेचे पालन करावे, असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.