जिल्हय़ातील 133 पीकेपीएस, 21 तात्पुरत्या केंद्रांतूनही बी-बियाणे उपलब्ध, खरीपसाठी कृषी खाते सज्ज
प्रतिनिधी /बेळगाव
कृषी खात्याने खरीप हंगामात जिल्हय़ात 7.53 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याबरोबरच शेतकऱयांना वेळेत बी-बियाणे उपलब्ध व्हावीत, यासाठी 189 सेवा केंद्रांतून बी-बियाणांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हय़ात 35 रयत संपर्क केंदे, 133 पीकेपीएस संघ तर 21 तात्पुरत्या सेवा केंद्रांतून बी-बियाणांचे वितरण होणार आहे.
गतवषी 7.16 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यंदा त्या तुलनेत 36 लाख हेक्टर क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे बी-बियाणांचा पुरवठाही अधिक लागणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने कृषी खात्याने सर्व तयारी केली आहे. जिल्हय़ात 42 हजार 909 क्विंटल बी-बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत. शिवाय आवश्यकतेनुसार वाटपही केले जात आहे. खाद्यतेलांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने भूईमूग आणि सोयाबिनकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. त्यामुळे भूईमूग आणि सोयाबिनचे क्षेत्र वाढणार आहे. जिल्हय़ात 42 हजार 909 क्विंटलपैकी 3 हजार 528 क्विंटल बी-बियाणांचे वाटप झाले आहे. यंदा वळीव आणि मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने पेरणी वेळेवर होणार आहे. यासाठी कृषी खात्याने बी-बियाणे उपलब्ध केली आहेत.
जिल्हय़ातील एकूण रयत संपर्क केंद्र आणि पीकेपीएस संघांची संख्या
तालुके | रयत संपर्क केंद्रांची संख्या | पीकेपीएस संघांची संख्या |
बेळगाव | 4 | 11 |
सौंदत्ती | 4 | 15 |
रामदुर्ग | 4 | 6 |
खानापूर | 4 | 6 |
बैलहोंगल | 3 | 29 |
अथणी | 4 | 16 |
चिकोडी | 4 | 18 |
गोकाक | 3 | 16 |
हुक्केरी | 3 | 31 |
रायबाग | 2 | 6 |
एकूण | 35 | 154 |
बी-बियाणांचा एकूण साठा
पिके | उपलब्ध बी-बियाणांचा साठा |
सोयाबिन | 35550 क्विंटल |
मका | 3415 क्विंटल |
भात | 960 क्विंटल |
मूग | 925 क्विंटल |
सूर्यफूल | 225 क्विंटल |
हार्बेट भात | 32 क्विंटल |
ज्वारी | 232 क्विंटल |
तूर | 475 क्विंटल |
उडीद | 830 क्विंटल |
भूईमूग शेंगा | 150 क्विंटल |
कापूस | 115 क्विंटल |
एकूण | 42909 क्विंटल |