उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना तसेच त्याचे वडील नेत्रपाल सिंग यांना गौतम बुद्धनगर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. सीमा हैदर आपला आपल्या ऑनलाईन मित्र आणि नंतर प्रियकर झालेल्या सचिन मीनासोबत राहण्यासाठी भारतात आली आहे.
गेले काही दिवसापासून सोशल मीडीयावर चर्चेत असलेल्या सीमा हैदर आणि तीचा प्रियकर सचिन मीना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून आज त्यांची चौकशी करण्यात आली. गौतम बुद्धनगरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त आनंद कुलकर्णी यांनी सांगितले कि, “यापुर्वी उत्तर प्रदेश पोलिस एटीएसने स्थानिक ग्रेटर नोएडा पोलिसांना सीमा हैदर, सचिन मीना आणि नेत्रपाल सिंग यांची राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चिंतांबाबत चौकशी करणार असल्याचे कळवले होते. त्यानंतर या तिघांना गेल्या महिन्यात आम्ही त्यांना ताब्यात घेतले होते. केंद्रीय एजन्सी आणि उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाला आम्ही याबाबत कळवले होते. त्यानुसार ते तपास करत आहेत.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, एटीएसने फक्त त्यांची चौकशी केली आहे. त्यांना तुरुंगात टाकले नाही. सीमा हैदर ही पाकिस्तानी नागरिक असून तिच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या गेल्या आहेत. एक ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्य़ासंदर्भात तिच्या भारतात बेकायदेशीर घुसखोरी करण्यास अनेक घटक सामील असल्याचे सांगून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिची चौकशी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.