प्रतिनिधी /पणजी
दिल्लीच्या कर्तव्यपथावरील परेडमध्ये गोव्याची म्हापसा आकय येथील सोहली सुदेश नागवेकर हिची निवड झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस अंतर्गत तिची निवड करण्यात आली. चाणक्मय पुरी इंटरनॅशनल युथ होस्टेल इथे 01जानेवारी 2023 पासून तिचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे ते 31 जानेवारी 2023 पर्यंत असेल. सोहली ही सेंट झेवियर कॉलेजमध्ये टी वाय बी ए शिक्षण घेत आहे. निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे