नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सीईओपदी रोहित जावा यांची निवड करण्यात आली आहे. 27 जूनपासून जावा हे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. संजीव मेहता हे याआधी सदरचे पद कंपनीमध्ये सांभाळत होते. जवळपास दहा वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर मेहता हे निवृत्त झालेत. द. आशियातील हिंदुस्थान युनिलिव्हरची धुरा जावा हे अध्यक्ष म्हणून सांभाळणार आहेत.
परिचय ः 56 वषीय जावा हे सध्याला लंडनमधील युनिलिव्हरचे काम पाहात आहेत. 1988 मध्ये ते कंपनीमध्ये दाखल झाले होते. भारत, दक्षिण-पूर्व आशिया आणि उत्तर आशियात कंपनीच्या व्यवसाय विस्तारात त्यांनी हातभार लावला होता.