कराडला समाधीस्थळाची एकनाथ शिंदेंकडून पाहणी
सुभाष देशमुखे/कराड
महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांनी समाधीस्थळाची पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, अनिल बाबर, आमदार महेश शिंदे,पुरूषोत्तम जाधव, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधीस्थळाला महापुराच्या काळात बसणारा फटका याची आमदार, अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. यावर त्यांनी प्रशासनाला काही सुचना केल्या.