जागतिक घडामोडींचा परिणाम : सेन्सेक्स 671 अंकांनी पडला
मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी जागतिक पातळीवरील घडामोडींच्या प्रभावाने आर्थिक, आयटी व भांडवली वस्तुंच्या समभागांत मोठी विक्री राहिल्याचे दिसून आले. याचा नकारात्मक परिणाम झाल्याचा फटका सेन्सेक्स व निफ्टी यांना बसला आहे.
सेन्सेक्स व निफ्टीमध्ये 1 टक्क्यांची घसरण राहिली. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 671.15 अंकांनी कोसळून निर्देशांक 59,135.13 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 176.70 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 17,412.90 वर बंद झाला आहे.
शुक्रवारच्या सत्रात 21 समभाग हे घसरणीसह बंद झाले. यामध्ये अदानी समूहाचे समभाग हे मात्र तेजीत राहिले होते. यासोबतच बँकिंग क्षेत्रासह एचडीएफसी बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियाचे समभाग हे चार टक्क्यांनी घसरले आहेत.
शुक्रवारी अदानी समूहाचे समभाग हे 5 टक्क्यांनी मजबूत राहिले. यासोबतच अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅसचे समभाग हे क्रमश: 5 टक्क्यांनी वधारले आहेत. अदानी पॉवरचे समभाग हे 4 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. ज्या बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक समभाग नुकसानीत राहिले आहेत. त्यामध्ये बँक ऑफ इंडियाचे समभाग हे 3.91 टक्क्यांनी तर कॅनरा बँकेचे समभाग हे 3.91 टक्क्यांनी प्रभावीत झाले. एचडीएफसी बँकेचे समभाग हे 2.61 टक्क्यांनी नुकसानीत होते. यासोबतच स्टेट बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक यांचे समभाग 1 टक्क्यांनी घसरले. तसेच बजाज फायनान्स आणि कोटक बँकेचे समभाग हे सर्वाधिक प्रभावीत राहिले असून विप्रो, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो व टाटा स्टील यांचे समभाग नुकसानीत राहिले.
अन्य घडामोडींचा परिणाम
अभ्यासकांच्या माहितीनुसार शुक्रवारी बाजारात आर्थिक, बँकिंग, आयटी आणि भांडवली वस्तुंच्या समभागात विक्री राहिली. याचा परिणाम हा आशियातील बाजार व अमेरिकेतील बाजारात दिसून आला आहे.