शाहूवाडी, प्रतिनिधी
Shahuwadi News : वाकुर्डे खुर्द ते अंत्री खुर्द या दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्याची झालेले दुर्दशा अपघाताला निमंत्रण देत असल्याचे सध्या चित्र आहे.चालकांची होत असलेली कसरत आणि प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन सुरू असलेला प्रवास थांबणार कधी असा प्रश्न प्रवासी तसेच नागरीकांतून होत आहे. सतत वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्याची झालेल्या या अवस्थेन नागरिकांचे हाल होत आहेत.
वाकुर्डे खुर्द ते शिराळा या मार्गावर असलेल्या वाकुर्ड खुर्द ते अंत्री खुर्द या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य उभा राहिले आहे.त्याच्या मध्यभागी पडलेला खड्डा हा अपघाताला निमंत्रण देत असल्याची घटना समोर आली आहे. गेले अनेक दिवस या मार्गावरील रस्त्याची झालेली ही अवस्था अपघाताला कारणीभूत ठरल्यावरच संबंधित विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून होऊ लागला आहे.
ऐन पावसाळ्याच्या दिवसात एसटीची होत असलेली कसरत ही नक्कीच धोकादायक ठरत आहे.यावर संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन या मार्गावरील रस्ता सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.