बेळगाव / प्रतिनिधी
वस्त्र प्रावरणे आणि पोषख यांच्यामध्ये किती प्रकारचे वैविध्य असू शकते याचे प्रत्यंतर शारदोत्सव सोसायटी आयोजित आंनद मेळामध्ये झालेल्या फॅशन शो ने दिले. शनिवारी रामनाथ मंगल कार्यालय येथे हा फॅशन शो झाला. यासाठी गीता कित्तूर, अनुपमा जोशी, धनश्री मुचंडी, शिल्पा मनोज यांचा पुढाकार होता.
प्रारंभी आशा कुलकर्णी यांनी स्वागत केले. अनुपमा जोशी यांनी फॅशन शो बद्दल आपले विचार सांगितले. दोन फेऱयानंतर शिल्पा मनोज यांनी परिक्षकांचा परिचय करून दिला. या शो मध्ये दैवज्ञ, स्वामीनि, साशी आणि काशी, हिरकणी, नाविन्य रॉक्स, क्रिएटिव्ह माईंडस्, रे ऑफ होप, जीएसएसचा बीसीए विभाग या संघानी भाग घेतला.
या स्पर्धेत रे ऑफ होप प्रथम, नाविन्य ग्रुप द्वितीय क्रमांक, हिरकणीने तृतीय क्रमांक पटकाविला. परीक्षक म्हणून नवनीत पाटील व अवंती पाटील यांनी केले.
या आनंद मेळाला बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक महिलांना आपल्या पाककृतीचे कौशल्य सादर करता आले. त्यांच्या कलेला वाव मिळाला. रविवारी रात्री या मेळाव्याचा समारोप होत आहे अशी माहिती इव्हेंट चेअरमन बिंबा नाडकर्णी यांनी दिली.