मुंबई
भारतीय शेअर बाजारात लँडमार्क कार्सचा समभाग गेल्या दोन दिवसांमध्ये 17 टक्के इतका वाढला असल्याचे दिसून आले आहे. 506 रुपये प्रतिसमभाग इश्यू किमतीपेक्षा कंपनीचा समभाग 15 टक्के अधिक वाढत बाजारात व्यवहार करत होता. बीएसईवर शुक्रवारी इंट्रा डे दरम्यान कंपनीच्या समभागाने 10 टक्के वाढत 581 रुपयांवर पोहोचत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 26 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या समभागाचा भाव 433 रुपये इतका होता.