इश्यू प्राईसच्या जवळपास 20 टक्क्यांची पडझड झाल्याची नोंद
मुंबई
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी (एलआयसी)चे समभाग मागील काही दिवसांपासून सतत घसरणीचा प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये 949 रुपयाची इश्यू प्राईस जवळपास 20 टक्क्यांनी प्रभावीत राहिली आहे. मंगळवारच्या सत्रात एनएसईवर समभाग 24.45 रुपये म्हणजे 3.15 टक्क्यांनी घसरला आहे. सोबतच 752.90 रुपयांवर बंद झाला आहे.
दिवसभरातील व्यवहारात एलआयसीने 751.80 च्या नीच्चांकावर व 772.90 च्या वरील पातळीवर राहिला होता. सदरच्या घसरणीनंतर एलआयसीचे बाजारमूल्य 5 लाख कोटी रुपयांच्या खाली येत 4,76,683 कोटी रुपयांवर आले आहे. लिस्टिंगच्या वेळी 5.70 लाख कोटी बाजारमूल्य होते. मात्र एलआयसीने आपल्या इश्यू प्राईसवर 9 टक्के सवलतीवर लिस्ट झाला होता. बाजारमूल्यासोबत कंपनी पाचवी सर्वात मोठी लिस्टेड फर्म बनली होती.