वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीचा समभाग बुधवारी शेअरबाजारात चमकताना दिसला आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी सुमारे 3.45 लाख समभाग खुल्या बाजारात खरेदी केल्याने याचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसला आहे. मारुतीचा समभाग बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 2 टक्के वाढत 8700 रुपयांवर पोहचला होता. कंपनीचे प्रवर्तक सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने 3 लाखाहून अधिक समभाग खरेदी केले असून याकरीता 300 कोटी रुपये मोजले आहेत.