स्पाइसजेटचे समभाग 4 टक्के घसरले
मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने स्पाइसजेट हवाई कंपनीला कलानिधी मारन यांना 270 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले असून याचा परिणाम मंगळवारी शेअरबाजारात कंपनीच्या समभागावर नकारात्मक दिसला आहे. सदरचा समभाग मंगळवारी एनएसईवर इंड्रा डे दरम्यान जवळपास 4 टक्के घसरत 33.65 रुपयांवर खाली आला आहे. बीएसईवरही हा समभाग 3.99 टक्के घसरणीत होता. सर्वोच्च न्यायालयाने माजी प्रवर्तक कलानिधी मारन यांना 270 कोटी भरण्याचे आदेश दिले आहेत.