मुंबई
महाराष्ट्राकडून तीन प्रकल्पांचे काम मिळाल्याच्या बातमीने टोरेंट पॉवरचे समभाग शेअरबाजारात बुधवारी तेजी राखताना दिसून आले. कंपनीचे समभाग बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 8.88 टक्के वाढत 666 रुपयांवर पोहचले होते. अशा प्रकारे समभागाचे भाव बुधवारी उच्चांकी स्तर गाठण्यात यशस्वी झाले. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 31,607.76 कोटी रुपयांवर पोहचले होते. 5700 मेगावॅटचे तीन प्रकल्प कंपनीला प्राप्त झाले आहेत.