मुंबई
औषध क्षेत्रातील कंपनी झायडस लाइफसायन्सेसचा समभाग बुधवारी उच्चांकावर कार्यरत राहिला आहे. सदरच्या समभागाने बीएसईवर 517 रुपयांवर पोहचत 52 आठवड्यानंतर उच्चांकी झेप घेतली आहे. याआधी हा समभाग 515 रुपयांवर बंद झाला होता. 1.18 कोटीचे समभाग खरेदी करण्यात आल्याने समभाग तेजी राखू शकला आहे. अमेरिकेकडून एका औषधाच्या निर्मितीकरीता परवानगी कंपनीला मिळाली असल्याचे समजते.