मुंबई
देशातील मोठी खासगी क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड यांचा समभाग शेअरबाजारात बुधवारी 4 टक्के इतका घसरणीत होता. नुकताच कंपनीचा तिमाही निव्वळ नफ्याचा निकाल जाहीर झाला आहे. बुधवारी बीएसईवर 4.4 टक्के इतका समभाग घसरत समभाग 1080 रुपयांवर आला आहे. कंपनीने 39 टक्के वाढीसह 436 कोटी रुपयांचा निव्वळ नफा तिसऱ्या तिमाहीत कमावला आहे.