मंदिरात, घराघरांत जत्रोत्सवाच्या तयारीस प्रारंभ : अग्निदिव्याच्या होमकुंडासाठी येऊ लागली लाकडे
प्रतिनिधी /डिचोली
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे मोठय़ा स्वरूपात व उत्साहात होऊ न शकलेला शिरगावचा प्रसिद्ध श्री देवी लईराईचा वैशिष्टय़पूर्ण जत्रोत्सव यावषी पूर्ण स्वरूपात आणि उत्साहात गुरुवार 5 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. तसा संदेश देवस्थान समितीकडून जाहीर करण्यात आल्याने यावषी देवी लईराईचे शिरगाव गजबजणार आहे. जत्रोत्सवाला मोठी उपस्थिती अपेक्षित असून जत्रोत्सवाच्या तयारीला आतापासूनच सुरूवात झाली आहे.
शिरगावातील देवी लईराईचा जत्रोत्सव म्हणजे भाविक भक्तांसाठी पर्वणीच असते. मोठय़ा संख्येने धोंडगणांचे अग्निदिव्य मार्गक्रमण गेली दोन वर्षे होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे या हजारो धोंडगणांच्या साक्षीने देवी लईराईचेही यावषी अग्निदिव्य मार्गक्रमण पहायला मिळणार आहे. जत्रोत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली असून होमकुंडस्थळी मोठय़ा प्रमाणात होमकुंडासाठी लाकडे आणण्यात आली आहेत.
डिचोली, सांखळी बाजारात सामान दाखल
या जत्रोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्येही विविध सामानांची या दिवसांत मोठी रेलचेल असते. धोंडगणांना आपले सोवळे व्रत पाळण्यासाठी सर्व सामान नवीन घ्यावे लागते. त्यासाठी बाजारांमध्ये सामान मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी दाखल होत असते. सध्या डिचोली, सांखळी बाजारात रेडिमेड सोवळी, चटया, टॉवेल, वाले, चप्पले, कपडे व इतर सामान दाखल झाले आहे.
मंदिरात, घरांमध्ये रंगरंगोटी सुरु
जत्रोत्सवासाठी शिरगाववासीय आतूर झाले असून दोन वर्षांच्या खंडानंतर देवीचे आपल्या अंगणात स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांकडून तयारीला वेग आला आहे. घरांची रंगरंगोटी व इतर कामांमध्ये सध्या शिरगाववासीय वेळ देत असल्याचे दिसून येत आहे. मंदिरावरही साज चढविण्याच्या कामाची तयारी झालेली आहे.
होमकुंडाला लाकडे न वाहण्याची सूचना
दरवषी देवीच्या होमकुंडाला लाकडांचे भारे किंवा मोळय़ा अर्पण करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. होमकुंडाला फेरे मारून नवस बोलल्यानंतर अनेकजण दुसऱया वषी नवस पूर्ण झाल्यावर लाकडांच्या मोळय़ा डोक्मयावर घेऊन होमकुंडाला प्रदक्षिणा घालून ती लाकडे होमकुंडाला अर्पण करतात. परंतु होमकुंडाला लाकडाच्या मोळय़ा वाहण्याची कुठलीही प्रथा नसल्याने लोकांनी लाकडाच्या मोळय़ा होमकुंडाला वाहू नये. त्यासाठी कुठल्याही व्यक्तीकडून या मोळय़ा विकत घेणे आणि सांगणे करून घेणे अवैध आहे, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
देवस्थान समितीकडे लाखो रूपये खर्च करून जत्रोत्सवात होमकुंडासाठी लाकडांची व्यवस्था केली जाते. होमकुंडाला लाकडे देण्याची सेवा करणाऱया भक्तांनी मंदिरात येऊन रितसर पावती काढावी. कुठल्याही ठिकाणी जाऊन स्वतःहून लाकडांच्या मोळय़ा वाहू नये, अशी विनंती करणारे सूचना फलक देवस्थान समितीतर्फे होमकुंड परिसरात लावण्यात आले आहेत. या सूचनेचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.