कसबा बीड /प्रतिनिधी
शासनाने आरोग्य विभागात चांगल्या सेवा सुविधा लोकांना मिळाव्यात या दृष्टीने कायाकल्प स्पर्धा ठेवली होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवा मूल्यमापन करणेत आले. करवीर तालुक्यातून सन 2019/20 व सण 2020/21 व सण 2021/22 असे सलग तीन वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमालाने करवीरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
यामध्ये दैनंदिन opd व आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवा व अंतर्गत स्वछता व बाह्य स्वच्छता व आरोग्याचे राष्ट्रीय 18 इंडिगेटर कार्यक्रम व ncd कार्यक्रमा अंतर्गत शुगर बी पी पेशंट सेवा व लोकसहभाग व प्रशासकीय कामकाज व कायाकल्प चेकलिस्ट प्रमाणे मूल्यमापन करून देणेत येणारे मार्क याकामी जिल्हा स्तरावरून एक टीम येते ते चेकलिस्ट प्रमाणे मूल्यमापन करून तालुक्यातून एक प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करते. गेले तीन वर्षे सलग प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमालाचा प्रथम क्रमांक येतो. यासाठी अहोरात्र प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ मधुरा मोरे, डॉ सुहास भोई व आरोग्य सहाय्यक मेहबूब शेख, आरोग्य सेविका चोपडे, व परिचर साळोखे, यशवन्त पाटील, पालकर, सिस्टर गीता सिस्टर डेटा ऑपरेटर नवनाथ,जांभळे सिस्टर व आरोग्य सेवक गणेश पाटील व गटप्रवर्तक संगीता पाटील व सर्व आशा स्वयंसेविका व करवीर तालुका आरोग्य अधिकारी व सर्व सुपर वायझर व ग्रामपंचायत मा शिरोली सरपंच, उपसरपंच व सदस्य, जि प सदस्य सौ शिल्पा चेतन पाटील व सामाजिक कार्यकर्ते चेतन पाटील याचेही सहकार्य मिळाले.यामुळेच गेली तीन वर्षे सलग पुरस्कार मिळाल्याने शिरोली दुमाला भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.