Shiv Jayanti celebrations at Nhaveli Gram Panchayat
न्हावेली ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज्याच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. जय जिजाऊ- जय शिवाजी, जय भवानी -जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. यावेळी सरपंच अंकीत धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक , ग्रा . पं. सदस्य अक्षय पार्सेकर , आरती माळकर , स्नेहा पार्सेकर , सागर जाधव , सागर धाऊसकर तसेच न्हावेली ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
न्हावेली प्रतिनिधी