प्रतिनिधी /मोरजी
भाद्रपद चतुर्थीला मंगलमूर्ती श्रीगणपतीची प्राणप्रति÷ापना करून भक्तिभावाने पूजन केले जाते. चतुर्थीच्या काळात श्रीगणेशाच्या अधि÷ानामुळे घराचे मंदिर बनते. याच कालावधीत पाच दिवसीय श्रीगणेश विसर्जनानंतर मोरजी या गावामध्ये होणाऱया शिवपूजन महोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. यंदा श्रीशिवप्रदोष उत्सव हनुमंत आरडकर यांच्या पोकेवाडा मोरजी येथील निवासस्थानी मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला.
भाद्रपद त्रयोदशीला प्रदोष व्रताच्या निमित्ताने श्रीशंभू महादेवाचे पूजन केले जाते. याचा आरंभ क्रांतिकारी धर्मगुरू सद्गुरु जीवनमुक्त महाराजांनी केला होता. गोवा मुक्तीपूर्व काळात सद्गुरु जीवनमुक्त महाराज यांनी पोर्तुगीजांची सत्ता असताना गोव्यातील गुडे-शिवोली येथे होमखांड, पीर्णा येथे गंगापूजन, दांडा-शिवोली येथे गुरु भंडारा, माळणे पिळर्ण येथे मकर संक्रांती असे उत्सव सुरू केले होते.
त्याप्रमाणे महाराजांनी मोरजी या गावामध्ये भाद्रपद त्रयोदशीला शिवप्रदोष व्रताच्या निमित्ताने भगवान शिव शंकराच्या पूजनाचा उत्सव सुरू केला होता. दरवषी हा उत्सव महाराजांचा शिष्य परिवार अखंडितपणे भक्ती भावाने साजरा करतात. या उत्सवांच्या माध्यमातून देवभक्ती बरोबर देशभक्तीचेही विचार पूजनीय जीवनमुक्त महाराजांनी जनसमूहात प्रज्वलित केले होते. भारतीय संस्कारमूल्यांचे संवर्धन करणाऱया या शिवप्रदोष उत्सवात ज्ये÷ांबरोबर युवकांचा बालकांचा सहभाग प्रशासनीय आहे, अशी माहिती गोवा विद्यापीठाचे डॉ. विनय मडगावकर यांनी दिली.
उत्सवाच्या निमित्ताने सकाळी शिवलिंग प्रति÷ापना रूद्राध्याय पठण श्रीशिव पंचाक्षरी मंत्राचा जप करण्यात आला व शिवलिंगावर बेलपत्र समर्पण करण्यात आले. संध्याकाळी तेजस आरडकर आणि दिव्यता आरडकर या यजमानाने प्रदोष व्रताचे आचरण करून भगवान शिव शंकराचे श्रद्धेने पूजन केले. तद्न?तर पूजनीय सद्गुरु जीवनमुक्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंप्रार्थना, धुपारती मंगलारती आणि मंत्रपुष्पा?जली झाली. तद्न?तर श्री प्रदोष व्रतकथा पठण झाले. गावातील शिवभक्त भाविकांनी प्रदोष व्रताचे आचरण करून बेलपत्र समर्पित केले, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाला. यावेळी पूजनीय जीवनमक्त महाराजांचा शिष्य संप्रदाय आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. श्री शिवआराधनेने या उत्सवाचे सांगता झाली.