उपनेत्या ज्योती ठाकरेंची उपस्थिती
कोडोली प्रतिनिधी
शाहूवाडी विधानसभा मतदार संघातील पन्हाळा तालुक्यात शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रविवार दि.८ रोजी शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा अभियान शिवसेनेच्या उपनेत्या व राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.पन्हाळा येथे सकाळी १० वा.,बांबरवाडी सकाळी ११ वा., आवळी १२ वा.,सातवे दुपारी २ वा.,मोहरे दुपारी ३ वा., काखेदुपारी ४ वा.,केखले दुपारी ५ वा. बहिरेवाडी सायं.६ वा., कोडोली येथील सर्वोदय चौकात सायं. ७ वा. हे अभियान पार पडणार आहे.
शाहूवाडी- पन्हाळा विधानसभा क्षेत्रात होऊ द्या चर्चा अभियानात सर्व सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यानी अभियानात ज्या त्या गावातील ग्रामस्थांना सक्रीय होऊन सहभाग वाढवण्यास प्रयत्न करावा या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, शाहूवाडी तालुकाप्रमुख दत्ता पोवार, पन्हाळा तालुकाप्रमुख बाबासो पाटील यांच्या समन्वयाने अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसहकार सेनेचे उपजिल्हा प्रमुख विरेंद्र पाटील यांनी सांगितले.