गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज नामवंत आयटी इंजिनियर सुनील चौगुले (वय ५५) यांचे शनिवारी पहाटे अकस्मित निधन झाले आहे. यांच्या निधनाने गडहिंग्लजचा आणखी एका उद्योगपतीचा मृत्यू चटका लावणारा ठरला. त्यांच्या या निधनाने शहरासह उद्योग क्षेत्रावर शोककळा पसरली असून शनिवारची पहाट सर्वांनाच सुन्न करून घेणारी ठरली. शहरातील आयटी क्षेत्रात भरारी घेतलेले इंजिनियर सुनील चौगुले हे कामानिमित्त शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. परत येत असताना शनिवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने अकस्मित निधन झाले आहे. अचानक जाण्याने उद्योगक्षेत्राची मोठी हानी झाली असून शांत, संयमी, मनमिळावू, फुटबॉल प्रेमी म्हणून ओळखले जाणारे चौगुले यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील उद्योजक रोहन हंजी, राहुल पाटील, संतोष शिंदे यांच्या आकस्मित निधनानंतर उद्योगपती सुनील चौगुले यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.