सिद्धेश तेंडोंलकर यांचा प्रशासनाला सवाल
न्हावेली / वार्ताहर
ऐन चतुर्थीच्या तोंडावर मळगावला वाली कोण ? असा सवाल सिद्धेश तेंडुलकर यांनी प्रशासनाला केला आहे.मळगाव सरपंच यांच्यावर अपात्र कारवाई झाल्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन ऐन गणेश चतुर्थीच्या काळात कर्मचारी पगार,रस्त्याची झाडी मारणे,गणेश चतुर्थी बाजार नियोजन यासारख्या महत्वाच्या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी याबाबतीत विशेष लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर यांनी केली आहे.