कोल्हापूर प्रतिनिधी
गुंतवणूकदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक करुन गुंतवणूकदारांह पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या म्होरक्या लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले. गणपतीच्या दर्शनासाठी घरी जात असताना महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले. यामुळे या प्रकरणातील अन्य संशयीतांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
कमी कालावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतलेली कोट्यावधी रुपयांची रक्कम ए एस ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांना परत केली नाही. ऑक्टोबर 2022 पासून परतावे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. नोवहेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात ए एस ट्रेडर्स कंपनीसह 27 संचालक आणि एजंटवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून कंपनीचा प्रमुख आणि फसवणुकीच्या मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार अटक टाळण्यासाठी धावपळ करीत होता. अटक टाळण्यासाठी सुभेदानरे मुंबई उच्च न्यायालयासह, सर्वोच्च न्यायालयतही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर स्वत:हून पोलिसात हजर होणार असल्याची माहिती ऑनलाइन मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिली होती. मात्र, त्यानंतरही तो पोलिसाना गुंगारा देत होता. गेल्या काही दिवसांपासून स्वत: ऑनलाईन मिटींगद्वारे गुंतवणूकदारांशी संपर्क साधून पैसे परत देणार असल्याचीही माहिती समोर आली होती.
याच दरम्यान गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोहितसिंग सुभेदार मंगळवारी कोल्हापूर जिल्हयात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलीस निरीक्षका स्वाती गायकवाड, राजू वरक, दिनेश उंडाळे, सावंत, यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चार महिन्यात 9 अटक
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या चार महिन्यांपासून या गुह्यांतील नऊव्या संशयितास अटक केली. मुख्य सूत्रधाराच्या अटकेमुळे आता अन्य संचालक आणि संशयितही लवकरच हाती लागतील अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या पैकी विक्रम जोतिराम नाळे (रा. सांगरूळ, ता. करवीर), सुवर्णा श्रीरंग सरनाईक (रा. रंकाळा, कोल्हापूर), बाळासो कृष्णात धनगर (रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) आणि बाबासो भूपाल धनगर (रा. नेर्ली, ता. करवीर), अमित शिंदे, श्रुतिका सावेकर, आशिष बाळासाहेब गावडे यांना आर्थिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले आहे