नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाचे विद्यमान चेअरमन दिनेश खारा यांना आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 33.42 लाख वेतन प्राप्त झाले आहे. एसबीआयच्या वार्षिक अहवालामध्ये सदरची माहिती समोर आली आहे. 2020-21मध्ये या पूर्वी या पदावर असणाऱया रजनीश कुमार यांच्यापेक्षा तेरा टक्के अधिक वेतन खारा यांनी प्राप्त केले आहे. 1984 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून दिनेश खारा हे स्टेट बँकेमध्ये रुजू झाले होते. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी चेअरमनपदाचा कार्यभार सांभाळला.