नवी दिल्ली
दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 1 जूनपर्यंत वाढविली आहे. वाचनासाठी टेबल अन् खुर्चीची सिसोदियांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर विचार करण्याचा निर्देश न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना दिला आहे. सिसोदिया हे दिल्लीतील अबकारी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.