केदारनाथ धाम बर्फाच्छादित ः लाहौलच्या शिखरांवर 4 इंच बर्फ
शिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शुक्रवारीही हिमवृष्टीचा वर्षाव झाला. सोलंगनालापासून लाहौलच्या शिखरावर 4 इंच बर्फाचा थर जमा झाला आहे. अटल बोगद्याजवळही हिम साचल्यामुळे वाहनांना संथ गतीने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. नारनौलमध्ये रात्रीचे तापमान 2.2 अंश होते, तर मेवातमध्ये 3.3 अंश आणि भिवानीमध्ये 3.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या सरासरी तापमानात 4.5 अंशांनी वाढ झाली आहे. आता रात्रीचे तापमान सामान्य झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये कडाक्मयाची थंडी होती. त्यातच काही भागात हिमवृष्टी झाल्याने नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला. दुसरीकडे, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हरियाणातील नागरिकांना कडाक्मयाच्या थंडीपासून दिलासा मिळाला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ढगाळ वातावरण राहिल्यामुळे पारा वाढल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 23 ते 26 जानेवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्मयता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. 24-25 जानेवारीला डोंगराळ भागात बर्फवृष्टी होऊ शकते. यानंतर थंडी वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.