डीजीपी जस्पाल सिंग यांचे प्रतीपादन एसपीसीआर पोलिसांसाठी प्रशिक्षण वर्ग
प्रतिनिधी /पणजी
समाजाची सेवा करणे पोलिसांचे कर्तव्य असून त्याचे पालन करण्यास प्रधान्य दिले पाहिजे, असे पोलीस महासंचालक जस्पाल सिंग यांनी सांगितले. पोलिसांनी नेहमी सर्तक रहाणे नितांत गरजेचे आहे. असेही डीजीपी म्हणाले.
गोवा पोलीस (एसपीसीआर) व कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्पॉट स्किल डव्हलपमेंट एसपीसीआर पोलीस कर्मचाऱयांसाठी प्रभावी संवाद या विषयावर आल्तीनो येथील पोलीस सभागृहात आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस महानिरीक्षक ओमर सिंग (आयपीएस) कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालक दिपक देसाई, एसपीसीआर पोलीस अधीक्षक निधिन वॉल्सन (आयपीएस) व उपअधीक्षक रॉय परेरा व अन्य यावेळी व्यसपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना डीजीपी जस्पालसिंग म्हणाले की एसपीसीआर विभागातून विविध फोन कॉल्सना समोरे जाण्यासाठी शारिरीक आणि संभाषण कौशल्य प्रशिक्षित पोलीस कर्मचारी असणे महत्वाचे आहे. ज्यामध्ये लोकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकणे समाविष्ट आहे. शब्दामध्ये जादुची शक्ती असते सकंटात असलेल्या व्यक्तीला कुशलतेने आणि प्रभावीपणे समोरे जाण्याची आवश्यकता आहे असेही डीजीपी जस्पाल सिंग यांनी सांगितले.
इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम (इआरएसएस)-122 गोव्यात ऑक्टोबर 2019 पासून कार्यरत असून सर्व संकटाशी संबंधीत पोन कॉल्स घेत आहेत. महिला हेल्प लाईन 1091, जेष्ट नागरिक हेल्प लाईन 1090, कोस्टल हेल्प लाईन 1093, सायबर क्रईम हेल्प लाईन 135260 तसेच विविध प्रकारचे त्रास संबधीत फोन कॉल्स हाताळत आहेत. त्यानिमित्त एसपीसीआर पोलीस कर्मचाऱयांना एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी इआरएसएस मध्ये फोन कॉल्स कशाप्रकारे हाताळावे याबाबत माहिती दिली. उद्घाटन कार्यक्रमात पोलीस महानिरीक्षक ओमर सिंग यांनी गोवा पोलीसांना जनतेशी नम्रपणे आणि प्रभावीपणे बोलण्याचे महत्व या विषेयावर संबोधीत केले. निधीन वॉल्सन यांनीही आपले अनुभव कथन केले तर दिपक देसाई यांनी पोलीस कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यास पूर्ण सहकार्य करण्यास पूर्ण वचनबध्द असल्याचे सांगितले, रॉय परेरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.