नवी दिल्ली:
वेदांता लिमिटेडच्या चिफ फायनान्शियल ऑफिसरपदी (सीएफओ) सोनल श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. सोनल या आपली नव्या पदाची जबाबदारी येत्या 1 जूनपासून प्रत्यक्षात स्वीकारतील. सोनल यापूर्वी हॉलसीम समूहात होत्या. तेथे या पदाच्या माध्यमातून आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व व आफ्रिका येथील कार्यालयांचा कारभार पाहात होत्या. जागतिक उत्तम अनुभव व चांगल्या कामगिरीचा विचार करून त्यांची निवड करण्यात आल्याचे चेअरमन अनिल अगरवाल यांनी सांगितले.