ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालवली असून, त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. अरूप बासू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रायपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनात सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नव्हती. 2 मार्चला म्हणजेच ताप आल्यानंतर त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
अधिक वाचा : बापटांनी कधी पैसे वाटले नाहीत