ओटवणे प्रतिनिधी
Sarmalet – Death of Gava Redya in Nevli forest
सरमळे नेवली जंगलात काजऱ्याचा टेंब येथे शुक्रवारी सकाळी गवा रेडा मृतावस्थेत आढळला. दरम्यान या गवा रेड्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन शिरसागर, वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक शशिकांत देसाई, संतोष देसाई, वन कर्मचारी श्री सावंत, श्री गावडे आदीनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी रामचंद्र तेली यांनी शवविच्छेदन केल्यानंतर या गवा रेड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.