प्रतिनिधी / बेळगाव
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नुकताच झालेल्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात बेळगाव तालुक्मयातील सुमारे पंचवीसहून अधिक खेडय़ांतील वारकऱयांच्या दिंडय़ांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. विविध भागातून पायी चालत आलेल्या या वारकऱयांनी प्रभाकर कोरे यांच्यावर आशीर्वादरुपी भजनांचा गजर केला.
500 हून अधिक वारकरी या दिंडी सोहळय़ात सहभागी झाले होते. वीणाधारी वारकरी, डोईवर तुळस घेतलेल्या महिला, वारकरी टाळ-मृदंग, अभंगवाणीच्या सुरात निघालेल्या दिंडय़ांचे सभामंडपापर्यंत आगमन झाले. सभामंडपाचे हे खास आकर्षण ठरले. सभामंडपात उपस्थित असलेल्या पाहुणे मंडळींनी व प्रेक्षकांनी टाळय़ांच्या गजरात या पायी दिंडय़ांचे स्वागत केले. यावेळी उत्तर कर्नाटकात असलेल्या वारकरी सांप्रदायाचे दर्शन उपस्थित प्रेक्षकांना झाले.
दिंडी सोहळय़ाचे आयोजन करण्यासाठी येळ्ळूर-धामणे येथील दिंडीप्रमुख केरवाडकर, अजित पाटील, आंबेवाडी येथील कुलदीप तरळे, कोचेरी इंजिनिअर, कुदेमनी गावातून मल्लाप्पा पाटील, अर्जुन जांबोटकर, निंगाप्पा पाटील, मुतगे येथील शामराव पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले.