वारणानगर, प्रतिनिधी
कोडोली ता.पन्हाळा येथील ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनास ग्रामस्थांनी प्रतिसाद देत पर्यावरण पूरक गौरी गणपती विसर्जनाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये १२४५ श्री च्या मूर्ती आणि १.५ टन निर्माल्य दान कऱण्यात आले.पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंखेने मोठ्या असलेल्या कोडोली ग्रामपंचायतीने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपुरक गौरी गणपती विसर्जन नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये न करता ग्रामपंचायतीने तयार केलेल्या कृत्रिम जलकुंडामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करून मूर्ती दान करणे व निर्मल्य दान करणे बाबत नागरिकांना आवाहन केले होते.
ग्रामपंचायतीच्या या आवाहानाला कोडोली ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंभ उभारण्यात आले होते.काल घरगुती गौरी विसर्जनास दिवसभर १२४५ गणेश मूर्ती आणि जवळपास १.५ टन निर्मल्य दान केले.
सरपंच भारती पाटील,उपसरपंच प्रविण जाधव, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेऊन जलप्रदूषण टाळण्यासाठी मदत केल्यामुळे आभार मानले. निर्माल्य गोळा करण्यासाठी विनामोबदला आपला ट्रॅक्टर देऊन श्री महेश देशमुख यांनी सहकार्य केले अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण यानी दिली.