वार्ताहर /उसगांव
तिस्क उसगांव येथील कल्पित नामदेव नाईक यांच्या मालकीच्या मेडिकेअर पॉलिक्लिनिकतर्फे आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त मोफत आरोग्य व रक्ततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
डॉ. सुनील गावडे, डॉ. अशोक वेळीप, डॉ. अन्वेश गांवकर, डॉ. नम्रिता नाईक, डॉ. वर्षा केरकर यांनी रुग्णांची तपासणी केली.
कल्पित नाईक यांनी सांगितले की रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून तिस्क उसगांव येथे मेडिकेअर पॉलिक्लिनिक व अमृत औषधालयाची स्थापना करण्यात आली आहे. केवळ पैसा कमविणे हा उद्देश नसून रुग्णांना चांगली व दर्जेदार आरोग्य सेवा लाभावी. रुग्णांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा व दूर ठिकाणी न जाता उसगावातच तपासण व उपचार व्हावा असा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून दवाखाना व औषधालयाची स्थापना करण्यात आली आहे. सामान्य चिकित्सक, कान, नाक, घशाचा डॉक्टर, स्त्रीरोगतज्ञ व प्रसुतीतज्ञ, लहान मुलांचा डॉक्टर, समुपदेशन केंद्र, ऑडिओलॉजिस्ट व श्रवणयंत्र अशी विविध तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाते. समाजाला आपण देणं लागतो या समर्पित भावनेतून मोफत आरोग्य व रक्ततपासणी शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नामदेव विश्राम नाईक, शुभांगी नामदेव नाईक, अन्य मान्यवर तसेच मेडिकेअर पॉलिक्लिनिक आणि अमृत औषधालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. 215 रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.