चार दिवस विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /तिसवाडी
मळार – ओल्ड गोवा येथील श्री वनदेवी मुकोबा मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा 36 वा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि. 4 ते 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत विविध धार्मिक विधी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.
शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. महापुजा, अभिषेक, आरत्या, तीर्थ प्रसाद होईल. दुपारी 3 वा. श्री वनदेवीची पालखीतून मिरवणूक निघणार असून घरोघरी श्री वनदेवीचे आगमन, पुजा तसेच ओटी भरण्याचा विधी होणार आहे. रात्री पालखीचे परत मंदिरात आगमन होणार असून यावेळी दिवजोत्सव व फुगडी होईल. त्यानंतर विविध मनोरंजनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्नेहसंमेलन सादर करण्यात येईल.
रविवार 5 फेब्रुवारी, सकाळी धार्मिक विधी, रात्री 9 वा. श्रींच्या वस्तुंची पावणी, आणि त्यानंतर 10 वा. ‘घरान आयली सून, माय जाली हुन’ हे विनोदी नाटक सादर करण्यात येईल. अक्षय कोरगावकर यांनी हे नाटक लिहिले असून महेंद्र पर्वतकर यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रशांती च्यारी, सदानंद भोमकर, लोचंद्र खांडेपारकर, अमित शिरोडकर, महेंद्र पर्वतकर, योगेश शिरोडकर, अभय खांडेपारकर, सुप्रिया कुर्तिकर, मनोज काणकोणकर, विश्वेश शिरोडकर हे कलाकार भूमिका रंगविणार आहेत.
सोमवार 6 फेब्रुवारी, सकाळी धार्मिक विधी, रात्री 9 वा. श्रींच्या वस्तुंची पावणी, 10 वा. कला चेतना वळवई निर्मित ‘रे मना’ हे नाटक सादर करण्यात येईल.
मंगळवार 7 फेब्रुवारी, सकाळी धार्मिक विधी, रात्री 9 वा. श्रींच्या वस्तुंची पावणी, 10 वा. श्री वनदेवी महिला मंडळातर्फे ‘संस्कृती कलानंद’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री वनदेवी मुकोबा देवाच्या कृपेस पात्र व्हावे, तसेच नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री वनदेवी मुकोबा देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.