श्री चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : श्री स्पोर्ट्स खडकगल्लीत आयोजित तिसऱ्या श्री चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अलरझा अ, एसआरएस हिंदुस्थान संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला. अझर गवस, मुकेश शिंदे, फयाज, संदिप मकवाना यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एवायएम बी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 92 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना अलरझा संघाने 8 षटकात 6 गडी बाद 93 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. दसऱ्या सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 61 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना चव्हाटा एसपीने 8 षटकात 8 गडी बाद 49 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात दक्ष एसपी निलजीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 59 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना अलरझाने 5.3 षटकात 2 गडी बाद 63 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. चौथ्या सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 115 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिव इलेव्हन खानापूरने 8 षटकात 6 गडी बाद 74 धावा केल्या.
बुधवारचे सामने : 1) रॉयल पेंग्ज वि. एवायएम अ स. 9 वा. 2) साईराज ब वि. राहुल केआर शेट्टी अथणी दु. 12 वा. 3) शिवसेना मुतगा वि. पहिल्या सामन्यातील विजेता दु. 1 वा. 4) श्री स्पोर्ट्स वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता दु. 3 वा.