सांगली : प्रतिनिधी
नाईकबाहुन सांगलीला जाणा-या एसटीचा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात सांगलीवाडी येथे झाला. या अपघातात बसच्या चालक, वाहकासह एकूण 16 प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघाताबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नाईकबा हून सांगलीच्या दिशेने जाणा-या बसचे चाक स्लीप झाल्यामुळे हा अपघात झाला. ही बस सांगलीवाडी टोल नाक्याच्या ऑफिसला धडकली. बसचा पूढचा भागाचे माेठे नुकासन झाले आहे. हा अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी बसच्या दिशेने धाव घेतली. या अपघातातील जखमींना तातडीने बसमधून बाहेर काढले. काहींनी रुग्णवाहिका बाेलावली हाेती. बहुतांश जखमींनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.