राज्याच्या पावसाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार गटाच्या आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि आपल्याबरोबर येण्यासाठी विनंती केली. पक्ष एकसंध रहावा यासाठी भाजपबरोबर सरद पवारांनी यावं यासाठी सुमारे तासभर बैठक झाली. आम्ही शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचे अजित पवार गटाचे प्रवक्ते खासदार प्रप्फुल पटेल यांनी म्हटले आहे.
वाय.बी. चव्हाण सेंटरच्या दारात माध्यमांबरोबर बोलताना ते म्हणाले, “काल रविवार असल्याने अजित पवारांच्या नेर्तृत्वाखाली आमदार आपापल्या मतदारसंघात होते. त्यामुळे ते काल येऊ शकले नाही. आज पावसाळी अधिवेशन असल्याने सर्व आमदार मुंबईत होते. त्यामुळे अधिवेशनापुर्वी शरद पवारांचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली” असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी शरद पवारांना पक्ष एकसंध रहावा यासाठी विनंती केल्याचे सांगिताना,”राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंध रहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी भेटही दिली तसेच आमचे म्हणने चांगल्या पद्धतीने एकूनही घेतले. पण अजूनही त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही” असे त्यांनी सांगितले.