हेरवाडकर, सेंट मेरीज यांना उपविजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सेंट पॉल्स स्कूलच्या 2001 च्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या फादर जेकब कार्वालो स्मृती चषक सिक्स-ए साईड आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत प्राथमिक गटात सेंट झेवियर्सने एम. व्ही. हेरवाडकरचा 5-0 असा पराभव करून तर माध्यमिक गटात सेंट पॉल्स संघाने सेंट मेरीज संघाचा 3-1 असा पराभव करून फादर जेकब कार्वालो चषक पटकाविला.
मराठा मंदिर शेजारील फुटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत माध्यमिक गटात खेळविण्यात आलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी सेंट पॉल्सचे प्राचार्य साव्हीओ आंद्रादे, प्रवीण बांदेकर आदी मान्यवरांना खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. पहिल्या सामन्यात संत मीरा संघाने केएलएसचा 3-2, दुसऱया सामन्यात सेंट पॉल्सने ज्योती सेंट्रल स्कूलचा 2-0, तिसऱया सामन्यात सेंट झेवियर्सने एमव्हीएम अ चा 3-0, चौथ्या सामन्यात केएलएस पब्लिकने संत मिरा ब चा 3-2, पाचव्या सामन्यात सेंट पॉल्सने ज्ञानप्रबोधन मंदिरचा 3-0, सहाव्या सामन्यात सेंट मेरीजने मुक्तांगणचा 4-0, सातव्या सामन्यात गुडशेफर्ड संघाने केएलई इंटरनॅशनलचा 2-1, आठव्या सामन्यात एमव्हीएम बी संघाने हेरवाडकरचा 2-0 असा पराभव केला. पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल्स अ संघाने सेंट झेवियर्सचा 3-2 तर दुसऱया उपांत्य सामन्यात सेंट मेरीजने सेंट पॉल्स ब चा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सेंट पॉल्सने सेंट मेरीजचा 3-1 असा पराभव करून फादर जेकब कार्वालो चषक पटकाविला.
प्राथमिक गटात 14 वर्षाखालील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 5-0 असा पराभव करून कार्वालो चषक पटकाविला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रणित मांगले, विश्वास पत्रावळी, प्रवीण बांदेकर, प्रसाद बिस्ती, निहार हेरवाडकर, रविराज मेणसे यांच्या हस्ते विजेत्या सेंट पॉल्स व सेंट झेवियर्स तर उपविजेत्या सेंट मेरीज व हेरवाडकर यांना चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अल्लाबक्ष बेपारी यांनी काम पाहिले.